आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिका व्हायरस:पुणे जिल्ह्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळला, मात्र पूर्णपणे बरा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसताना आता आफ्रिकेतून आलेल्या झिका व्हायरसचा राज्यातील पहिला रुग्ण पुणे जिल्ह्याच्या बेलसर गावात आढळला. तथापि, ही ५० वर्षीय बाधित महिला पूर्णपणे बरी झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, ५ किमी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बेलसर गावात एक ते दीड महिन्यापासून डेंग्यू, चिकुनगुन्या व इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने बेलसरमधील ४१ नमुने तपासणीसाठी घेतले. त्यात झिकाची लागण झालेली एक महिला रुग्ण आढळली. तिला चिकुनगुन्याही झाला होता. त्यामुळे हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. ती आता पूर्णपणे बरी झाली असून कुटुंबीयांतही काही लक्षणे नाहीत.

काय आहे झिका विषाणू?
झिका विषाणू हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. त्याच्या ८०% रुग्णांत कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात.

बातम्या आणखी आहेत...