आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाजार समितीत अडत्याकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवले जात आहेत. समितीच्या प्रशासनाने वसुलीची प्रक्रिया राबवत जवळपास पावणेदोन कोटी रुपये वसूल करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा आकडा तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा आहे, वास्तव परिस्थिती वेगळी असून थकीत रक्कम कैकपटीने जास्त आहे. अडत्यांकडे थकीत रकमेसाठी बाजार समितीकडे दाखला झालेल्या तक्रारी ४८० आहेत. त्यापैकी २४६ तक्रारीचे निवारण झाले असून त्यापोटी १ कोटी ८२ रुपये वसूल झाले आहेत. अद्याप २३४ शेतकऱ्यांचे १ कोटी २१ लाख अडकले आहे. सोलापूरच्या श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही वर्षात शेतीमालाचे पैसे अडत्याकडून थकवण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष कांदा विभागात हे प्रकार वाढले आहेत .
कायद्याने शेतीमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे तत्काळ देणे बंधनकारक आहे. कांदा विक्रीनंतर तब्बल महिन्यांनी पैसे देण्याची चुकीची पद्धत बाजार समितीत चालवली जात आहेत. काही अडते हे महिना उलटला तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात. हतबल शेतकरी दररोज आज तरी आपले पैसे मिळतील या अपेक्षेने अडत्यांच्या दुकानासमोर बसून राहतात . यातील काही सुजाण शेतकरी या बाबत बाजार समितीत लेखी तक्रार दाखल करतात. तक्रार दाखल झालेल्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम वसूल करण्याची कारवाई करत आहे.
थकीत आकडा हिमनगाचे टोक शेतीमालाच्या थकीत बाकीसाठी बाजार समिती दाखल झालेला आकडा आणि बाजार समितीत रक्कम थकलेल्या शेतकऱ्यांची संख्या यात मोठी तफावत असल्याचा दावा केला जात आहे. या मागे शेतकऱ्यांना तक्रार करण्याच्या प्रक्रियेबद्दल असलेले अज्ञान व ते तसे राहावे यासाठी बाजार समितीचे प्रयत्न त्याच बरोबर अडत्यांना असणारे बाजार समितीतील संचालकांचे राजकीय संरक्षण कारणीभूत आहे.
पैसे थकवणाऱ्या अडत्यांचा गाळा सील करुन रक्कम वसुलीची तरतूद ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे थकवले जातात अशा शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होतात संबंधित अडत्याकडून शेतकऱ्यांच्या रकमेची वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाते. संबंधित आडत्याचा गाळा ताब्यात घेऊन रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे. यामुळे रक्कम थकलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क करावा. विनोद पाटील ,कांदा विभाग प्रमुख
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.