आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छळ:पॉवरलूमसाठी 1 कोटीची मागणी,‎ पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल‎

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाॅवरलूम घेण्यासाठी एक कोटी रुपये‎ घेऊन येण्यासाठी सासरी छळ केल्याप्रकरणी तिघांवर‎ गुन्हा दाखल झाला आहे. श्रावणी प्रेम पोटाबत्ती ( वय‎ २८, रा. श्रद्धा अपार्टमेंट, पद्मा नगर सोलापूर ) यांनी‎ पतीसह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात फिर्याद‎ दिली. प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती (पती) , ज्योती‎ पोटाबत्ती (सासू), श्रीनिवास पोटाबत्ती ( सासरे, रा.‎ सृष्टी नगर अक्कलकोट रोड ,सोलापूर) यांच्यावर‎ गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २७ डिसेंबर २०२०‎ ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सासरी घडला‎ आहे. प्रेम हे नोकरीनिमित्त गुडगाव हरियाणा येथे होते.‎ त्यावेळी माहेरहून एक कोटी घेऊन ये, सोलापूरला‎ पाॅवरलूम फॅक्टरी खरेदी करून व्यापार धंदा करतो,‎ तुझ्या वडिलांची आम्हाला आर्थिक मदत होईल म्हणून‎ तुझ्याशी लग्न केले‌ असे म्हणत मानसिक छळ केला.‎

बातम्या आणखी आहेत...