आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सात डेबिट कार्ड वापरून 1 लाख 99 हजार लंपास

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मे. हिताची पेमेंटस सर्व्हिसेस प्रा. लि. व्ही. कंपनीच्या एटीएम सेंटरमधून सात डेबिट कार्डद्वारे १ लाख ९९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही बाब कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीच्या सुपरवायझर किरण लांडगे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. यावरून अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कंपनीच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. डेबिट कार्ड वापरून २३ वेळा व्यवहार करीत एक लाख ९९ हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार कसा घडला. फसवणूक प्रकारात काेणा काेणाचे एटीएम वापरण्यात आले आहेत, त्याचा पासवर्ड काय होता, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. एटीएमचा वापर करणारा व्यक्ती काेण आहे याचा तपास केला जात असल्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक दांडगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...