आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा‎:बेरोजगारांसाठी उद्यापासून 10  दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रव्दारा जिल्हा‎ उद्योग केंद्रातर्फे ७ ऑक्टोबरपासून सोलापुरात‎ दहा दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण‎ आयोजिले आहे.‎ स्वतःचा लघु उद्योग, व्यवसाय, यशस्वी‎ उद्योजक होण्यासाठी ही पूर्ण वेळ कार्यशाळा‎ आयोजिली आहे. नोकरी करणारे नाही तर‎ नोकरी निर्माण करून देणारे बना ! हा या‎ प्रशिक्षणाचा व्यापक अर्थ आहे.

व्यवसायाच्या‎ विविध संधी, उद्योग सुरू करण्याचे विविध टप्पे,‎ शासकीय भांडवलाच्या व विविध‎ अनुदानाविषयी यावर मार्गदर्शन करण्यात येईल.‎ प्रशिक्षणासाठी ८ वी पास, १८ ते ५० वय‎ आवश्यक आहे. कार्यशाळेस माफक शुल्क‎ राहील. अधिक माहिती व प्रवेशासाठी राम सुतार‎ ( ९२२६१९६०५० किंवा ९९६०३७३०१९) यांच्याशी‎ संपर्क साधावा. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण‎ करणाऱ्यास प्रमाणपत्र मिळेल तरी सोलापूर‎ शहरातील व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार‎ युवक-युवतींनी प्रशिक्षणचा लाभ घ्यावा,‎ उद्याेजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी‎ राजशेखर शिंदे यांनी केले आहे.‎

या विषयावर असेल मार्गदर्शन‎ कार्यशाळेत शेतीपूरक व खाद्य पदार्थनिर्मिती उद्योग,‎ ऑनलाइन बिझनेस आणि मार्केटिंग, भांडवलाचे‎ नियोजन, व्यक्तिमत्व विकास व उद्योजकीय‎ कौशल्य, ग्राहक कौशल्य, बाजारपेठेची माहिती,‎ आधुनिक उद्योग प्रणाली, यशस्वी उद्योजकाचे‎ यशोगाथा व मनोगत, उद्योगाविषयी बँकांची‎ भूमिका, एमआयडीसी मध्ये उद्योगासाठी लागणारी‎ जागा व त्याची सविस्तर माहिती, कच्चा मालाचा‎ शोध व माहिती, विक्री व्यवस्थापन इत्यादी विषयांचे‎ तज्ञ व्यक्तींकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.‎

बातम्या आणखी आहेत...