आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनात शिमगोत्सव:20 दिवसांत 10 दिवसच कामकाज; त्यातही तहकूब, तहकूब ‘जिंदाबाद’! गृहमंत्र्यांचे उत्तर चाचपडतच, भाजपला घेरण्याचा प्रयत्न

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पीय अधिवेशनात २० दिवसांच्या सभागृहात निम्मेच दिवस कामकाज चालले. त्यातही तहकूब, तहकूब होतेच. पूर्वी विधानसभेत जवळपास आठ-आठ दिवस चालणारी अर्थसंकल्पावरील चर्चा आता दीड दिवसावर येऊन ठेपली. २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ गुन्हेगारी विषयावरील चर्चेने सभागृहाला घेरल्याचे चित्र पाहायला मिळाले. आघाडीतील दोन मंत्र्यांची चौकशी लावून त्यांना अटक करण्यात यशस्वी झाल्यानंतर पलटवार म्हणून भाजपमधील देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न सत्ताधारी महाघाडीने केला खरा. पण तो चाचपडत केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उत्तरावरून स्पष्ट होत होते. अधिवेशनाची सुरुवातच कधी नव्हे त्या चुकीच्या पद्धतीने झाली. राज्यापाल अभिभाषण अर्धवट सोडून आणि राष्ट्रगीत न म्हणताच निघून गेले. अर्थातच गोंधळ हे त्याचे कारण होते. पुढेही गोंधळ आणि तहकूब, तहकूब अशातच अधिवेशन चालले. देवेंद्र फडणवीस यांची चाैकशी लावली गेली, त्यांचा जबाब नोंदवला गेला. त्यावरून जे आरोप झाले त्याला उत्तर देताना फडणवीसांना आरोपी करण्यासाठी हा जबाब नाही, असे स्पष्टपणे वळसे पाटील यांना सभागृहात सांगावे लागले. त्यांनी आपल्या शांत स्वभावात राहूनच चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. पण तेवढा जोश उत्तरात दिसला नाही.

अंदाजपत्रकावरील चर्चा गुंडाळली, गुन्हेगारी विषयावरील चर्चेवरच भर

दररोज ३ तासच झाले कामकाज...
तीन मार्चपासून सुरू झाल्यापासून २० दिवसांत सभागृहाचे कामकाज केवळ १० दिवस चालले. सरासरी प्रत्येक दिवशी केवळ तीन तासच सभागृह चालल्याची माहिती आहे. त्यातही प्रत्येक दिवशी किमान दोववेळा तहकूब झाले. पहिला दिवस राज्यापालांच्या भाषणाच्या गोंधळात संपला. त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि नवाब मलिकांच्या राजीनामा मागणीवर सभागृह दिवस-दिवसभर तर नंतरचे दोन दिवस सातत्याने तहकूब राहिले. अंदाजपत्रक दुपारी दोन वाजता मांडले गेले, त्यांनतरही कामकाज तहकूब राहिले. अनेकवेळा तारांकित, लक्षवेधी विषयही पुढे ढकलले गेले.

भाजपलाही आघाडीचे दमदार प्रत्युत्तर
राज्यातील बँकांमधील १२ शाखांमध्ये जवळपास १३ हजार ४३.५७ कोटींचा घोटाळा झाला, त्याच्या चौकशीला राज्याचे गृहखाते परवानगी देत नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. त्याला उत्तर देताना सीबीआयकडेच तपास रखडल्याचे प्रत्युत्तर गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले. अशाच पद्धतीने आणखी एक दमदार उत्तर अजित पवारांनी भाजपला दिले. त्यात साखर काररखाने विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर भाजपचे सरकार असताना चौकशी झाली, तेव्हा क्लीन चिट मिळाली. पुढेही वेगवेगळ्या एजन्सींनी तपास केला तेथेही क्लीन चिट दिल्याचे सांगताच भाजपचा आरोप एकदम मावळला.

दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, हसीना आपा हीच नावे चर्चेत
अधिवेशनाची सुरुवातच कधी नव्हे त्या चुकीच्या पद्धतीने झाली. राज्यापाल अभिभाषण अर्धवट सोडून आणि राष्ट्रगीत न म्हणताच निघून गेले. अर्थातच गोंधळ हे त्याचे कारण होते. पुढेही गोंधळ आणि तहकूब, तहकूब अशातच अधिवेशन चालले. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी लावली गेली, त्यांचा जबाब नोंदवला गेला. त्यावरून जे आरोप झाले त्याला उत्तर देताना फडणवीसांना आरोपी करण्यासाठी हा जबाब नाही, असे स्पष्टपणे वळसे पाटील यांना सभागृहात सांगावे लागले. त्यांनी आपल्या शांत स्वभावात राहूनच चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. पण तेवढा जोश उत्तरात दिसला नाही.

बातम्या आणखी आहेत...