आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर रेल्वे विभागात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. परिणामी वर्षाला इंधन खर्चात १२२ कोटी रुपयांची बचत होणार असून विजेवर चालणाऱ्या रेल्वेमुळे प्रदूषणही कमी होणार आहे. संपूर्ण विद्युतीकरण साध्य करून सोलापूर विभागाने पर्यावरणपूरक मार्ग सुनिश्चित केला. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन राष्ट्राच्या मौल्यवान परकीय चलनाची बचत झाली आहे. अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, विद्युत अभियंता हर्षल बिश्नोई यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
चालू आर्थिक वर्षात ५७ हजार टन कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्याच्या दिशेने मिशन मोडमध्ये काम करत आहे. वर्ष २०२३ पूर्वी “नेट झीरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे वाटचाल करत आहे. रेल्वेला पर्यावरणपूरक, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर आणि नवीन भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रवाशांचे आधुनिक वाहक तसेच मालवाहतूकदार होण्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाते, असेही परिहार म्हणाले.
विद्युतीकरणाचे फायदे असे पर्यावरण-अनुकूल वाहतुकीचे साधन, आयात इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन मौल्यवान परकीय चलनाची बचत आणि कार्बन फूटप्रिंट कमी होते. ऑपरेटिंग खर्चात बचत. अवजड मालवाहतूक गाड्या आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या उच्च क्षमतेच्या प्रवासी गाड्या आणि थ्रूपुट अर्थात ठराविक वेळेत कार्यक्षमता वाढवते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.