आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपत्ती व्यवस्थापनांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 100 होमगार्डची नेमणूक करणार; पोलिस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची माहिती

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनडीआरएफ व एसडीआरफ (आपत्ती व्यवस्थापन ) अंतर्गत काम करणारी पथके आहेत. याच धर्तीवर जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १०० होमगार्ड ( गृहरक्षक जवान) जवानांना या टीममध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा प्रस्तावही राज्य शासनाला सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात काम सुरू झाल्याची माहिती गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

श्री. उपाध्याय शुक्रवारी सोलापुरात आल्यानंतर संवाद साधला असता ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष असते. यामध्ये कुठेही पूरस्थिती, अप्रिय घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापन पथक काम करते. यात शंभर जवानांना नियुक्ती देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यांना मुंबईत तीन महिने प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यानंतर हे पथक प्रत्येक जिल्ह्यात काम करेल.

होमगार्ड कार्यालयास भेट, समस्या घेतल्या जाणून विजापूर रोड, आयटीआयच्या पाठीमागील होमगार्ड विभाग कार्यालय आहे. या ठिकाणी डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रत्येक विभागाची माहिती घेतली. जवान आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...