आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीच नसल्याने 100 जास्तीचे शिक्षक:अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची माहिती

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याने शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या 10 हून कमी विद्यार्थी असलेल्या 43 तर 20 हून कमी विद्यार्थी असलेल्या 40 प्राथमिक शाळा आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने अंदाजे 200 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिवाय 330 खासगी प्राथमिक शाळांपैकी 90 शाळांमध्ये पटसंख्येअभावी 100 शिक्षक अतिरिक्त ठरणर आहेत. विधानपरिषदेत मंत्र्यांनी सुद्धा ही बाब मान्य केली असून खासगी प्राथमिक शाळेतील 70 शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत शिक्षकांच्या समयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री केसरकर यांनी उत्तर दिले. या प्रश्नाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्येत घट होत असल्याचे समोर आले आहे.

गणवेश मिळालेच नाहीत

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद शाळामध्ये पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी राज्य शासनाने वेळेत निधी उपलब्ध करून दिला. पण शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे हा निधी वेळेत पोहोचलाच नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत गणवेश मिळालेले नाहीत. हा निधी शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरित झालाच नाही.

निधी वितरीत झाला नाही

सोलापूर जिल्ह्याला शासनाने 8.90 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. निधी प्राप्त होताच 15 दिवसात तो व्यवस्थापन समित्यांना वितरित करणे बंधनकारक आहे. मात्र तो अद्याप वितरित झालेला नाही. यावर मंत्री दीपक केसरकर यांनी निधी वितरणाचे काम बँक ऑफ महाराष्ट्रला देण्यात आले आहे. पीएफएमएस प्रणालीद्वारे हे काम केले जाते पण ही प्रणाली नवीन असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे मोफत गणवेशाचे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यास विलंब झाल्याचे मान्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...