आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:गणपती विसर्जन करताना गर्दीत दहा हजारांचा मोबाइल पळविला

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती घाट येथे गणपती विसर्जनासाठी गेल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन चोराने दहा हजार किमतीचा मोबाइल पळवला आहे. राजेंद्र साठे ( रा. उमा सहकारी गृहनिर्माण संस्था, जुनी मिल कंपाऊंड ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत रविवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ९ सप्टेंबर रोजी रात्री घडला होता. गर्दीचा फायदा घेऊन चोराने साठे यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला आहे.

बुधवार पेठेत दुचाकी चोरीला
बुधवार पेठ, वसुंधरा अपार्टमेंट समोर लावण्यात आलेली दुचाकी ( एमएच १३ सीएफ ००५६) चोरांनी पळवली आहे. नाना लेंडवे ( रा. दहिटणे ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत रविवारी फिर्याद देण्यात आली आहे. हा प्रकार सात सप्टेंबर रोजी घडला होता. चोराने बनावट चावीचा वापर करून दुचाकी पळवून नेली आहे.

दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
भरधाव दुचाकीची ( एम एच १३ डीबी २३१२) धडक बसून लक्ष्मीबाई पेराल ही महिला जखमी झाली आहे. श्रीनिवास पेराल ( रा. स्वाद हॉटेल जवळ, हैदराबाद रोड) यांनी एमआयडीसी पोलिसांत ११ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ ऑगस्ट रोजी खान चाचा हॉटेल समोर घडला होता. लक्ष्मीबाई पेराल या रिक्षातून खाली उतरल्यानंतर त्यांच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. त्यांचे दोन दात निखळले आहेत, तोंडाला मार लागला आहे.

बुधवार पेठेत एकाची आत्महत्या
न्यू बुधवार पेठ, रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारे प्रवीण प्रभाकर जाधव ( वय ३८) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठच्या सुमाराला समोर आला. नातेवाइकांनी हा प्रकार पाहून पोलिसांच्या मदतीने उपकाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगण्यात आले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची प्राथमिक नोंद आहे.

अनोळखी महिलेचा मृत्यू
रेल्वे डीआरएम ऑफिस जवळ एका ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना उपकाराला सदर बझार पोलिसांनी दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगण्यात आले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची प्राथमिक नोंद आहे.

बातम्या आणखी आहेत...