आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 10th And 12th Class Students Will Also Get The Benefit Of Discounted Sports Marks This Year; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​स्पर्धेविना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सवलतीच्या क्रीडा गुणांचा फायदाही मिळणार

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8, 9 व 11 वीदरम्यान केलेली सर्वोत्कृष्ट क्रीडा कामगिरी विचारात घेणार

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे क्रीडा गुण देण्याबाबतच्या सूचना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास २८ मेच्या पत्रान्वये दिल्या आहेत. यातून अाता या सर्व विद्यार्थी खेळाडूंना याचा माेठा फायदा मिळणार अाहे. कोरोना महामारीमुळे अनेक राज्ये व राष्ट्रीय खेळाडू क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकले नाहीत. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. यासाठी संबंधीत खेळाडूच्या यापूर्वीची कामगिरी विचारात घेण्यात येणार अाहे.

यातूनच हा ग्रेस गुणांचा फायदा संबंधित खेळाडूंना दिला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवी व नववी इयत्तेतील क्रीडा कामगिरी तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी इयत्तेतील क्रीडा कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी सवलतीचे क्रीडा गुण मिळण्याचे प्रस्ताव शाळेमार्फत जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावेत. यातून खेळाडूंचे काेणत्याही प्रकारचे नुकसान हाेणार नाही. यंदा काेणत्याही स्पर्धा हाेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना ग्रेस गुणांची सवलत मिळणार अाहे.

क्रीडा शिक्षक महासंघाने केलेल्या प्रयत्नांना यश
यंदा कोरोना महामारीमुळे राज्य व राष्ट्रीय स्पर्धा हाेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील खेळाडू क्रीडा स्पर्धेत सहभागी हाेऊ शकले नाही. अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंचे नुकसान हाेऊ नये, यासाठी राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने सवलतीचे क्रीडा गुण मिळण्याबाबत प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे सर्वांना याचा फायदा हाेणार अाहे. दशरथ गुरव, जिल्हाध्यक्ष, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...