आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची कट ऑफ यादी जाहीर:महाविद्यालयांत मुलांची गर्दी, 13 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभरापासून रखडलेली अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली​ आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी पाहण्यासाठी मुलांची गर्दी केली होती.

यंदा कट ऑफ कमी

यंदा मुलांची टक्केवारी जास्त असल्याने कट ऑफ वाढेल, असे अपेक्षित होते. मात्र विज्ञान शाखेचा कट ऑफ ८९ ते ८६ टक्केदरम्यान लागला आहे. संगमेश्वरमध्ये विज्ञान शाखेचा कट ऑफ खुला गटासाठी ८८ टक्के, ए.डी.जोशी महाविद्यालयात ८९ टक्के, दयानंद महाविद्यालयात ८८.८० टक्के, हरिभाई देवकरण महाविद्यालयात ८६.४ टक्के लागला आहे. नामवंत महाविद्यालयांत कला शाखेला येईल त्यास प्रवेश मिळणार आहे.

13 ऑगस्टपर्यंत प्रवेश

एरव्ही ऑगस्ट महिन्यात कनिष्ठ महाविद्यालये सुरु होतात. मात्र यंदा अकरावीची गुणवत्ता यादी उशिरा प्रसिध्द झाली. राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश पूर्व अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया राबवली. मात्र, केंद्रीय बोर्डाचा निकाल प्रलंबित असल्याने अकरावी प्रक्रिया वेळेत हाेवू शकली नाही. निकाल लागल्यानंतरही अर्ज दाखल करण्यासाठी दि २९ जुलैपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत अर्जाची छाननी व गुणवत्ता यादी तयार करुन शुक्रवारी महाविद्यालय स्तरावर प्रसिध्द केली आहे. गुणवत्ता यादीनुसार निवड झालेल्या मुलांना योग्य कागदपत्रांच्या आधारे १३ ऑगस्टपर्यंत प्रवेश दिला जाईल. जिल्ह्यात अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एकुण ७६ हजार एवढी प्रवेश क्षमता आहे. तरी, मार्च २०२२ मध्ये दहावीच्या परीक्षेत एकुण ६३ हजार मुलं उत्तीर्ण झाली. प्रवेशापासून कोणीच वंचित राहणार नाहीत.

प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही

शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी सांगितले की, अकरावीचा कट ऑफ जाहीर झाला असून गुणवत्ता व आरक्षणानुसार महाविद्यालय स्तरावर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश होतील त्यानुसार महाविद्यालय सुरुवात होणार आहे. सर्व नियमाचे पालन करीत प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या सुचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया होताच दुसरी यादीही जाहीर होईल. त्यानुसार प्रवेशापासून कोणीच वंचित राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...