आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची सर्व प्रक्रिया:११ वी गुणवत्ता यादी आज, २९ ऑगस्टला काॅलेज सुरू

सोलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी शुक्रवारी दुपारी ३ वाजता महाविद्यालय स्तरावर जाहीर होणार आहे. केंद्रीय बोर्डाचा निकाल उशीर लागल्याने यंदा अकरावी प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. या महिन्याभरात अकरावी प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून कनिष्ठ महाविद्यालये २९ ऑगस्टपासून प्रत्यक्षात सुरू होतील.

राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतर २३ जून ते ५ जुलैपर्यंत अकरावी प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. आधीच्या नियोजनानुसार ११ जुलै रोजी गुणवत्ता यादी लागणार होती. मात्र केंद्रीय बोर्डाचा निकाल लागला नव्हता, त्यामुळे मुलांना प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी २९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्राप्त अर्जांची छाननी आणि गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम झाले आहे. शुक्रवारी (५ आॅगस्ट) गुणवत्ता जाहीर होईल. त्यानंतर मुलांना १३ ऑगस्टपर्यंत प्रवेश दिला जाईल.१६ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशसाठीची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. जागा शिल्लक असल्यास गुणवत्तेनुसार प्रवेश होतील, असे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...