आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • 125 Proposals After The Arrival Of The Administrator In The Corporation; Picnic Spot On 47 Acres Of Land, Municipal Corporation Planning Of Rs. 14 Crores |marathi News

निर्णय:महापालिकेत प्रशासक आल्यानंतर 125 प्रस्ताव मार्गी; 47 एकर जागेत पिकनिक स्पॉट, पालिकेचे 14 कोटींचे नियोजन

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचा कारभार ६ मार्चला प्रशासकांच्या अधिकारात आला. या तीन महिन्यांत तीन वेळा प्रशासकीय ठरावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यात १२५ हून अधिक प्रस्तावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तुळजापूर रोडवरील कचरा डेपो परिसरात २०० मीटर अंतर बफर झोन म्हणून जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली. केगाव येथील ४७ एकर जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली. आता तेथे पिकनिक स्पॉट करण्यासाठी १४ कोटी २० लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता संपल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे प्रशासकीय कारभार आला. त्यानंतर पालिकेत कार्यालयासह अनेक कामात बदल दिसत आहेत. आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले. त्यात अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती, नगरोत्थान योजना, भांडवली कामे, जिल्हा नियोजन समिती अनुदान, शासकीय अनुदान आदी निधीबाबत निर्णय घेण्यात आले.

तर वर्षभरात पूर्ण होईल प्रकल्प
केगाव येथे ४७ एकर जागा आरक्षित आहे. त्या जागेत महापालिकेने दहा हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली. यामुळे महापालिकेला राज्य सरकारचा पर्यावरण पूरक मिळाला आहे. भविष्यातील निकड लक्षात घेऊन तेथे पिकनिक स्पॉट करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी १४ कोटी २० लाख ४७ हजार २०३ रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पर्यावरण व पर्यटन मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. सरकारकडून मंजुरी आणि निधी मिळाल्यास हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

कचरा डेपोत पिरसरात बफर झोन
भोगाव कचरा डेपो परिसरात २०० मीटर अंतरावर बफर झोन जाहीर करण्यात आले. यास मान्यता देण्यात आली. यासाठी समिती सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, तत्कालीन मुख्य लेखापाल शिरीष धनवे, नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसचिव प्रविण दंतकाळे यांची २५ मार्च रोजी बैठक झाली. त्यात केगाव व भोगाव येथील विकास कामांबाबत निर्णय घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...