आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरावरील 13 पुरस्कार विभागीय आयुक्त सौरभ राव व अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांचे हस्ते सीईओ दिलीप स्वामी यांना आज प्रदान करण्यात आले.
महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण सभारंभ विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हाॅल येथे पार पडला. सोलापूर जिल्हयास एकूण 13 पुरस्काराने सन्मानित करणेत आले.
या पुरस्कार वितरण समारंभास उपआयुक्त विकास विजय मुळीक, उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे, सहा आयुक्त सिमा जगताप काळे यांच्या प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी विविध पुरस्कार अतिरिक्त आयुक्त रामोड यांचे हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व तत्कालीन प्रकल्प संचालक तथा तत्कालीन प्रकल्प संचालक व सध्या वसुंधरा पाणलोट, जलसंधारण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांना व तालुकास्तरीय पुरस्कार गटविकास अधिकारी सचिन खुडे अक्कलकोट, सांगोला चे गटविकास अधिकारी , विनायक गुळवे (माळशिरस) , गटविकास अधिकारी आनंद मिरगणे मोहोळ, प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडके पाटील, उपसभापती माळशिरस प्रताप पाटील यांना यांना प्रदान करण्यात आला.
या उपक्रमांमुळे राज्य पुरस्कृत योजनेत विभागस्तरावर सर्वोकृष्ट तालुके (अक्कलकोट प्रथम, सांगोला व्दितीय, माळशिरस तृतीय) हे तीनही पुरस्कार सोलापूर जिल्हयाला प्रदान करण्यात आले.
विभागस्तरीय महाआवास अभियान पुरस्कार मध्ये प्रधानमंत्री आवास योजना प्रथम पुरस्कार निंबर्गी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलेश जोडमोटे, तृतीय पुरस्कार ग्रा.पं. मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर चे ग्रामसेवक नागेश जोडमोटे व राज्य पुरस्कृत योजना तृतीय पुरस्कार ग्रा. पं. भंडारकवठे चे ग्रामसेवक संजय राठोड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माळशिरस तालुक्याने सर्वाधिक लाभार्थ्यांना महाआवास अभियान कालावधीत जागा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल माळशिरस तालुक्यास प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विभागस्तरावर केंद्र व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत वाळू उपलब्धतेमध्ये सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुके या उपक्रमांत प्रथम पुरस्कार हा अक्कलकोट तालुका व व्दितीय पुरस्कार मोहोळ तालुक्यास प्रदान करणेत आला.
जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी - सीईओ स्वामी
महाआवास अभियानामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने विविध विभागामध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोरगरीबांना घरे उपलब्ध करीन देणे साठी मोहिम राबविली. सर्वानी घेतलेले मेहनतीस फळ मिळाले आहे. अशी प्रतिक्रिया सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, गटविकास अधिकारी, जिल्हा प्रोग्रामर सरफराज शेख, सरपंच व ग्रामसेवक व ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे टीम ने मेहनत घेतली आहे, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.