आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:शिक्षिकेच्या घरातून दोन तासांत 13 तोळे सोन्याचे दागिने चोरीस; जुळे सोलापुरातील रूबी नगरातील प्रकार

चोरी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका शिक्षिकेच्या घरातून दोन तासांत तब्बल १३ तोळे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना मंगळवारी घडली आहे. माधुरी अनिरुद्ध देशपांडे (रा. कुसुमश्री, भीमानगर, रूबी नगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला फिर्याद दिली.

हा प्रकार सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत घडला आहे. माधुरी देशपांडे एका शाळेत शिक्षिका आहेत. सकाळी पावणेअकराच्या सुमारास त्या शाळेत गेल्या होत्या. घराला कुलूप होते. चोराने मुख्य दरवाजाचे कुलूप कोयंडा उचकटून बाहेर अंगणात फेकून दिले. कपाटात ठेवलेले दागिने पळवले. यामध्ये ३ तोळ्यांचे लॉकेट, ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्यांची कानातील फुले, दोन तोळे प्रत्येकी एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि एक तोळ्याचा पोहे मोतीहार असे एकूण १३ तोळे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसे घेतले. श्वानपथकाची मदत घेतली. फौजदार मुरकुटे तपास करत आहेत.

चोरीचे सत्र काही थांबेना
दररोज चोरी, घरफोडी मोटारसायकल चोरी, लॅपटॉप, मोबाइल, पळवणे, दागिने पळवणे असे प्रकार सुरूच आहेत. पण गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरात दररोज रात्री नाकाबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, तसेच पहाटेच्या सुमारास बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी व चौकशी या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे. सातही पोलिस ठाण्याचे डीबी पथक, गुन्हे शाखेचे पथक चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी यांचा तपास जलद गतीने लावण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...