आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या घटना:मित्रांनी केल्या 14 घरफोड्या; 13 लाखांचा ऐवज केला जप्त

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्चभ्रू वस्तीतील बंद घराची दिवसा टेहळणी करायची, सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अवघ्या पाच ते दहा मिनिटांत चोरी करून पळायचे. उच्चभ्रू वस्तीतच चोरीच्या घटना, वेळही तीच यामुळे पोलिसांचा संशय वाढत गेला. त्यावर पाळत ठेवले, तांत्रिक बाबींचा आधार घेतला आणि दोघे जिवलग मित्रानींच मौजमजा करण्यासाठी १४ घरफोडी केल्याची घटना समोर आली. १३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रदीप धनाजी हेंबाडे (२०, रा. ढवळस रोड, मंगळवेढा), अजित बिरू मेटकरी (२१, रा. धर्मगाव रोड, मंगळवेढा) यांना अटक करण्यात आली आहे. १० एप्रिलपर्यंत दोघांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

या गुन्ह्यात तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. दरम्यान, याआधी आरोपींनी कुठे गुन्हे केले आहेत का? याचाही पोलिस आता तपास करत असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.