आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत लवकरच होणार 1,411 कर्मचाऱ्यांची भरती:प्रशासकीय प्रक्रियांना आला वेग, फेब्रुवारीत निघणार जाहीरात

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील तब्बल 1,411 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कामांना गती येत आहे. फेब्रुवारी महिन्यात 'गट क' मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार कर्मचार्‍यांची पद भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया करण्यास चांगलाच वेग आला आहे. राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय प्रसिध्द करुन जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा सरळ सेवेने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून रिक्त जागा सरळ सेवेने भरती करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

येत्या 15 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांचे बिंदू नामावली (रोस्टर) तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून भरतीचे आदेश येण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याचेही काम प्रशासनाने हाती घेतले आहे. शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, कनिष्ठ सहायकांना वरिष्ठ सहायकपदी, ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती प्रक्रिया झेडपी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती सुरू होण्यापुर्वीच न्याय मिळाला आहे. तसेच, अनुकंपा तत्वावरही पात्र असणार्‍या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सरळसेवा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

विभागनिहाय असलेली रिक्त पदे

सामान्य प्रशासन

लघुलेखक : 2

- बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता : 33

प्राथमिक शिक्षण विभाग

विस्तार अधिकारी शिक्षण :2

केंद्रप्रमुख : 80

शिक्षक : 624

सामान्य प्रशासन विभाग

लघुटंकलेखक : 2

वरिष्ठ सहायक :9

कनिष्ठ सहायक : 53

अर्थ विभाग

कनिष्ठ लेखाधिकारी :3

वरिष्ठ सहायक : 6

कनिष्ठ सहायक : ९

ग्रामपंचायत विभाग

ग्रामविकास अधिकारी : 19

ग्रामसेवक : 80

बांधकाम विभाग

आरेखक : 1

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : 88

कनिष्ठ आरेखक : 2

अनुरेखक :9

कनिष्ठ यांत्रिकी :1

जोडारी : 1

जॅक हॅम ड्रिलर : 2

आरोग्य विभाग

औषध निर्माण अधिकारी : 9

आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के फवारणी : 82

आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के :9

आरोग्य सेवक पुरुष 10 टक्के : 43

आरोग्य सेविका : 314

पशुसंवर्धन विभाग

पशुधन पर्यवेक्षक : 46

बातम्या आणखी आहेत...