आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून 24 तासांनी कारवाई:पोटफाडी चौकात हाणामारीत 15‎ जणांवर गुन्हा, 7 अटकेत दाखल‎‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटफाडी चौकात रविवारी रात्री अकराच्या‎ सुमाराला झालेल्या दोन गटातील हाणामारी प्रकरणी २४‎ तासानंतर १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान‎ यातील सातजणांना ताब्यात घेतल्याची माहिती सदर‎ बझारचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी दिली. पोटफाडी‎ चौक परिसरातील दोन गटातील मागील भांडणाचा वाद‎ रविवारी रात्री उफाळून आला होता. दोन्ही गट‎ आमने-सामने आले. दगडफेक केली. हातात लाठी काठी‎ घेऊन दहशत माजवली. चार-पाच वाहनांची तोडफोड‎ केल्यामुळे नागरिकात दहशत पसरली होती. पोलिसांनी‎ सोमवारी दिवसभरात या प्रकरणाची संशयितांची चौकशी‎ करून सातजणांना ताब्यात घेतले आहे. तर एकूण दोन्ही‎ गटातील पंधरा जणांवर गुन्हे दाखल आहे.‎

बातम्या आणखी आहेत...