आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या भटकी कुत्री, पिल्लांना खाऊ-पिऊ घालण्यासाठी ६८ वर्षांचे आर. के. चौधरी हे सहा वर्षांपासून सायकलवरून फिरतात. हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. सायकलवरून येणारे चौधरी दिसताच, अनेक कुत्री अन् त्यांची पिल्ले शेपटी हालवत त्यांच्या भोवताली घोळका करतात. चौधरी हे निवृत्ती वेतनातील पंधरा टक्के पैसा कुत्र्यांना दूध, बिस्कीट, टोस्टचे तुकडे घालण्यासाठी खर्च करतात.
विक्रीकर निरीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या चौधरी यांना कुत्र्यांचा सांभाळ करण्याची खूप आवड. पुणे विक्रीकर कार्यालयात कामावर असताना दररोज डब्यातील पोळी, भाकरी कुत्र्यांना आवर्जुन खायला घालायचे. सोलापुरात बालपण, शिक्षण झालेले असल्याने सेवानिवृत्तीनंतर मी सोलापुरात स्थायिक झालो. मुलगा, मुलगी व पत्नी पुण्यात असतात. एकांतपणा घालवण्यासाठी मी दररोज भटकी कुत्री, छोट्या पिल्लांना खाऊ घालतो, त्यासाठी निवृत्ती वेतनातील ठरावीक रक्कम खर्च करतो, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये तीर्थ यात्रेसाठी गेलो. यात्रेला जाण्यापूर्वी नियमित कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या परिसरातील काही ओळखीच्या लोकांकडे कुत्र्यांसाठी बिस्कीट, टोस्टचा चुरा ठेवून गेलो होतो. मी, येईपर्यंत भटक्या कुत्र्यांना उपाशी ठेवू नका, अशी विनंती केल्याचे चौधरी यांनी सांगितले.
महिन्याला ४० किलो तुटलेले टोस्ट
नई जिंदगी येथील एका बेकरीमधून ४० ते ४५ किलो तुटलेले टोस्ट, चुरा घेतो. यासाठी ८०० रुपये खर्च होतात. तसेच, दररोज १० पुडे बिस्किट व एक लिटर दूध खरेदी करतो. त्यासाठी दर महिन्याला तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च होतात. इतर कोणत्याही अनावश्यक खर्चाची सवय नसल्याने भटक्या कुत्र्यांना खाऊ-पिऊ घालतो. पहाटे साडेपाच वाजता सायकलला खाद्यपदार्थ अडकवून कुमठे नाका, पारशी विहीर, नई जिंदगी, होटगी रस्ता औद्योगिक वसाहत, डी-मार्ट, केटरिंग कॉलेज परिसरातील भटकी कुत्री, पिल्लांना खाऊ घालतो. दररोज कुत्र्यांना दूध, बिस्कीट घालण्याचा माझा नित्यक्रम पाहून प्राणी मित्र व गोकुलेश गोशाळेच्या सुचित्रा गडद या दररोज एक लिटर दूध कुत्र्यांसाठी देतात. सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा किलोमीटर पायी फिरत असल्याने माझी तब्येत ठणठणीत आहे.
आर. के. चौधरी, श्वान मित्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.