आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट:15 सरपंच; 352 सदस्य बिनविरोध

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. १८९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ५४० सरपंचपदाचे तर २२९१ सदस्यांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यातील १५ सरपंच, ३२५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. आता ४९८ सरपंच तर ३४२१ सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. १५ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. यामध्ये करमाळा व बार्शी तालुक्यातील सर्वाधिक ३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा समावेश आहे. अक्कलकोट व उत्तर सोलापूर तालुक्यातील एकही ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले नाहीत.

करमाळा तालुक्यात ३ सरपंच, ८५ सदस्य, माढा तालुक्यात एक सरपंच व ९ सदस्य, बार्शी तालुक्यात ३ सरपंच तर ३१ सदस्य, उत्तर सोलापूर तालुक्यात १७ सदस्य, मोहोळ तालुक्यात १ सरपंच व १५ सदस्य, पंढरपूर तालुक्यात १ सरपंच व १० सदस्य, माळशिरस तालुक्यात १ सरपंच व ५३ सदस्य, सांगोला तालुक्यात २ सरपंच व २३ सदस्य, मंगळवेढा तालुक्यात २ सरपंच व २३ सदस्य, दक्षिण सोलापूर तालुक्यात एक सरपंच व २५ सदस्य तर अक्कलकोट तालुक्यात ३४ सदस्य बिनविरोध झाले आहेत.

बिनविरोध सरपंचांची गावे
करमाळा तालुकयातील अंजनडोह, वंजारवाडी व लिंबेवाडी, बार्शी तालुक्यातील देवगाव, गाडेगाव, बेलगाव, माढा तालुक्यातील शिंगेवाडी, मोहोळ तालुक्यातील अर्धनारी, पंढरपूर तालुक्यातील सुगाव खुर्द, माळशिरस तालुक्यातील नेवरे, सांगोला तालुक्यातील चिणके, पाचेगाव खुर्द, मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी, फटेवाडी तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...