आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारत जाेडाे’ यात्रेसाठी साेलापूरचे 15 हजार कार्यकर्ते जाणार:आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली माहिती

साेलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे केंद्रीय नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जाेडाे’ यात्रा १७ नाेव्हेंबरला महाराष्ट्रात येत आहे. अकाेल्यातील या यात्रेत सहभागी हाेण्यासाठी साेलापूरचे १५ हजार कार्यकर्ते जातील, अशी माहिती पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दिली. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक येथे मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर खासदार गांधी महाराष्ट्रात येत आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारविरोधी धोरणे, ढासळलेली अर्थव्यवस्था, विद्वान, विरोधक, पत्रकार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुकूमशाही सरकारविरोधात ही यात्रा असल्याचे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...