आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडोत सोलापूर काॅंग्रेस ताकद दाखवणार:जिल्ह्यातून 15 ते 20 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सामील होणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काॅंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोड़ो पदयात्रा येत्या 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. सोलापुर शहर व जिल्ह्यातून 15 ते 20 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापुर शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आज रोजी काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, धनाजी साठे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सोमपा गटनेते चेतन नरोटे, महिला जिल्हा अध्यक्षा शाहीन शेख, शहर महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, उपस्थि होत्या.

यावेळी आ. प्रणिती शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत साडेतीन हजार किलोमिटरची दीडशे दिवसाची ही पदयात्रा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर आता कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा येत्या सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात देगलूर नांदेड़ येथे दाखल होणार आहे.

हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाणा, जामोद येथून मध्यप्रदेशात मार्गस्थ होणार आहे. आपले परमभाग्य आहे की आपल्याला या पदयात्रेत सहभागी होण्याचे संधी मिळणार आहे.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, सरकारी कंपन्या विकणे, संविधानिक संस्थाचा ग़ैरवापर, विरोधकांचा, पत्रकारांचा आवाज दाबुन टाकणाऱ्या हुक़ूमशाही मोदी सरकारच्या विरोधात सार्वसामान्यांच्या हितासाठी काढलेली ही भारत जोड़ो पदयात्रा आहे.

दीन, दलित, दिव्यांग, युवक, महिला, लहान मुले, अगदी प्राणी सुद्धा यात सहभागी झाले असून ही माणुसकीची यात्रा आहे. या ऐतिहासिक व गौरवशाली भारत जोड़ो पदयात्रेत सोलापुर शहर व जिल्ह्यातून पंधरा ते वीस हजार पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता, खेळाडू, विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आपल्या सोलापुर शहर व जिल्ह्याला अकोला जिल्ह्यातील बाळापुर विधानसभा मधील पातुर हे ठिकाण ठरवून दिले आहे.

सोलापुर शहर व जिल्ह्यातील सर्व सहभागी होणारे पदयात्री होम मैदान सोलापुर येथून दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता एकत्रित पणे बस, चारचाकी वाहनातून पातुर कड़े मार्गस्थ व्हायचे आहे. आणि दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:45 वाजता सोलापुर शहर व जिल्ह्यातील सर्व पदयात्री एकत्रितपणे राहुलजी गांधी यांच्यासमोर एंट्री करुण सोलापुरचा प्रभाव काँग्रेस कार्यकर्ते दाखवून देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...