आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास दीड लाखांचे बक्षिस:राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचीही घोषणा

प्रतिनिधी | सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे.

विशेष म्हणजे राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास पुणे राष्ट्रावादी काँग्रेसकडून 1 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता सोलापूर शिवसेनेतर्फेही दीड लाखांचे बक्षिस जाहीर करत असल्याची घोषणा सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली आहे.

राज्यपालांची हकालपट्टी करा

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करून संपुर्ण हिंदुस्थानातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांची ताबडतोब हकालपट्टी करावी व त्रिवेदी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

प्रतिमेला जोडे मारले

शिवसेनेच्या वतीने शहरात जोडो मारो आंदोलनही करण्यात आले. आंदोलनामध्ये राज्यपाल कोशारी आणि भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या प्रतिमांना शिवसैनिकांनी जोडे मारले. उपस्थित शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त करून या दोघांचाही निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी 'चले जाओ, चले जाओ कोश्यारी चले जाओ, कोश्यारी हाय हाय, तिवारी हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, भाजपा हाय हाय', अशा घोषणा दिल्या.

जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, उपशहरप्रमुख सुरेश जगताप, लहु गायकवाड, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रावादीकडूनही बक्षिस जाहीर

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात बॅनरबाजी केली आहे. बॅनरवर राज्यपालाचे धोतर फेडणाऱ्याला व फाडणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...