आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. सरपंच पदासाठी १६ व सदस्यपदाच्या ८४ जणांचे अर्ज बाद झाले. अद्याप एकाही उमेदवाराने दाखल केलेला अर्ज माघारी घेतला नाही.शुक्रवारी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १०६९ व सदस्यपदासाठी ५८८९ इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली होती. निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामपंचायतींसाठी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापूरे यांचा मुलगा श्रीदीप व चन्नप्पा बोरगी हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत.
बोरगी यांच्या अर्जावर बसवराज माळगे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली. रात्री उशारीपर्यंत त्यावर काथ्याकूट झाला. जिल्ह्यात अवैध ठरलेल्या सरपंचपदाचे सर्वाधिक चार इच्छुक मंगळवेढा व माळशिरस तालुक्यातील आहेत. तर, दक्षिण सोलापूरमधील ३ व बार्शी येथील दोघा इच्छुकांचा समावेश आहे. सदस्यांचे अवैध अर्ज सर्वांधिक मंगळवेढ्यातील २२, माळशिरसमधील १४ अर्ज आहेत. बुधवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवट दिवस असून त्यानंतर चिन्हांचे वाटप होईल.
तालुकावार अनुक्रमे सरपंच व सदस्य पदाचे बाद अर्ज
करमाळा ० व ८, माढा ० व ३, बार्शी २ व २, उत्तर सोलापूर १ व ५, मोहोळ ० व ६, पंढरपूर १ व २, माळशिरस ४ व १४, सांगोला ०, मंगळवेढा ४ व २२, दक्षिण सोलापूर ३ व १८, अक्कलकोट १ व ४.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.