आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी घ्या!:सोलापूर शहरात डेंग्यूचे 16 सशंयित रुग्ण; खबरदारी घ्या मनपा प्रशासनाचे आवाहन

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात डेंग्यूचे रुग्ण मिळत येत असून, 16 सशंयितावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. पावसाळा सुरु हाेण्यापूर्वी डेंग्यूने डोके वर काढल्याने चिंतेचे वातावरण आहे. विशेषता लहान मुलांना लागण होत आहे. 16 सशंयित असले तरी एकाचेही रिपाेर्ट पाॅझिटिव्ह नाही अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले. नागरिकांनी योग्य वेळी खबरदारी घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरात संसर्गजन्य आजार बळावत असून, डेंग्यूचे सशंयीत रुग्ण मिळून येत आहेत. विशेषता रेल्वे लाईन, विजापूर राेड, जुळे सोलापूर भागात रुग्ण मिळून येत आहेत. खासगी दवाखान्यात सशंयीत रुग्ण असून, त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर रुग्णांचे नमुने घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यायात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यापैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अन्य ९ जणांचे अहवाल येणे आहे.16 सशंयीत असले तरी एकाही रुग्णांस डेंग्यू लागण नाही.

सशंयीत रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने फवारणी करण्यात येत आहे. धुरावणी करणे बंद आहे. सशंयीत रुग्ण सापडलेल्या भागातील रोज सुमारे 100 घरातील पाण्याचे नमुने आणि ताप असलेल्या रुग्णांचा शोध महापालिका मलेरिया विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे.

महापालिका बेखबर

शहरात डेंग्यूचे रुग्ण असताना ते निगेटिव्ह आहेत असे सांगत महापालिका बेखबर असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूचे रुग्ण पावसाळ्यात वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मलेरिया विभाग प्रमुख पूजा नक्का यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...