आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:167 वर्षे जुन्या तृतीयरत्न नाटकाचा आज प्रयोग; रंगमंचावरील पहिले राजकीय नाटक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक क्रांतीचे उद्गाते महात्मा जोतीराव फुले यांनी १६७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्रसिद्ध तृतीयरत्न नाटकाचा प्रयोग गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे. सायंकाळी सहाला सुरू होणारा हा प्रयोग सर्वांसाठी मोफत ठेवला आहे. याचे आयोजन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे.

महात्मा जोतीराव फुले यांनी १८५५ मध्ये हे नाटक लिहिले. त्यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरित सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे, या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले हे राज्यातील विविध जिल्ह्यांत या नाटकाचा प्रयोग नेणार आहेत.

सोलापुरात होणारा हा २४ वा प्रयोग असेल. या नाटकाचे दिग्दर्शन अनिरुद्ध वनकर यांनी केले असून, क्रिएटिव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत.

या नाटकात एकूण ३० कलाकार व सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात २३ प्रयोगांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तृतीयरत्न नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘महाज्योती’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...