आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांवर गुन्हा दाखल:वृद्धेने बँकेत भरण्यासाठी दिलेले 1.80 लाख न भरताच केली फसवणूक

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका वृद्ध महिलेने बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरण्यासाठी १ लाख ८० हजार रुपये कोटणीस नगर येथील ग्राहक सेवा केंद्रामध्ये दिले. मात्र चालकाने पैसे न भरताच फसवणूक केली आहे.याप्रकरणी रत्नाबाई कृष्णा खडाखडे (वय ७३, रा. एसआरपी कॅम्प जवळ) यांनी विजापूर नाका पाेलिसात फिर्याद दिली असून बँक मॅनेजर, ग्राहक सुविधा केंद्रांचे चालक रविकांत चंद्रकांत पाटील, (रा. भंडारकवठे उत्तर सोलापूर) आणि प्रकाश पाटील ( रा. स्वामी विवेकानंद नगर जुळे सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.खडाखडे यांनी बँक ऑफ इंडिया कोटणीस नगर शाखेच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये टप्प्याटप्प्यात एकूण १ लाख ८० हजार रुपये भरण्यासाठी दिले होते.

मात्र त्याने ते पैसे भरलेच नाहीत. जेव्हा खडाखडे या बँकेतून पैसे काढण्यासाठी गेल्या तेव्हा बँकेतील त्यांच्या खात्यावर पैसे नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी पैसे भरले आहेत त्यांनाच विचारा असे सांगण्यात आले. तेव्हा या महिलेने ग्राहक सेवा केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न केला पण तो भेटलाच नाही. शेवटी त्या महिलेने त्याचे घर गाठले. त्याच्या वडिलांनी चालकाचा नंबर देण्याएेवजी त्याच्या भावाचा नंबर दिला. त्या महिलेने त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर तुमचे नाव लिस्टमध्ये नाही तुम्हाला पैसे देणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...