आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा 18 वा दीक्षांत समारंभ:विद्यार्थ्यांनी बदलणाऱ्या परिस्थीतीशी जुळवून घेऊन वाटचाल करावी - डॉ. सुहास पेडणेकर

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील काळात तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी जास्त असणार आहे. दरम्यान, नवीन अभ्यासक्रम व ज्ञान आत्मसात करा, बदलणाऱ्या स्थितीशी जुळवून घेऊन काम करा. कारण पदवी घेऊन लगेच नोकरी मिळणार नाही. स्वतः मध्ये इतर कौशल्य आवश्यक आहेत. त्यानुसार बदल करून वाटचाल करा असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ सोमवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडला. 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी, 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.

हा कार्यक्रम कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या समारंभास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित केले.

पुढे बोलताना डॉक्टर पेडणेकर म्हणाले की, पदवी घेतली म्हणजे सर्व काही शिक्षण संपले असे होत नाही. पदवी म्हणजे तुमच्या शिक्षणाचा भक्कम पाया आहे. जगाच्या पाठीवर विद्यार्थी तग धरून उभे राहतील. भविष्यात येणारे आव्हाने नेतृत्व गुण व कौशल्य आत्मसात करीत वाटचाल करावी.

यावर्षी 50 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. पीएचडी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 37 मुले तर 13 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. यंदा नवीन चार सुवर्णपदकाची वाढ झालेली आहे. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. यामध्ये तब्बल 32 मुली तर 25 मुलांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...