आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च शिक्षणातील सर्वोच्च संस्था यूजीसीने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे केंद्र वरीष्ठ महाविद्यालयातच असावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४ केंद्रे बंद करावी लागली आहेत. ही केंद्रे वरिष्ठ महाविद्यालयांत स्थलांतरित झाल्यानंतर या अभ्यासक्रमांतील प्रवेश होऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी विद्यापीठाला तत्काळ ही केंद्रे वरिष्ठ महाविद्यालयांत स्थलांतरित करावी लागणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे १९ केंद्र यानुसार बंद होतील. वरीष्ठ प्राध्यापक असतील त्याच ठिकाणी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील केंद्र अभ्यासकम बंद होतील.
गुणवत्ता वाढ आणि दर्जेदार शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांसाठी नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार मुक्त विद्यापीठांसाठीही नियमावली असून, पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम हे वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांकडून शिकविले जाणे आवश्यक आहे.
यूजीसी मान्यतेनंतरच केंद्र
मुक्त विद्यापीठातील ३२ अभ्यासक्रमांचे १५५१ पैकी ६५४ अभ्यासक्रम बंद होत असून त्याचे प्रवेशही विद्यापीठाने थांबवले आहेत. आता आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतरच ते सुरू हाेतील. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. '' डाॅ. प्रकाश देशमुख, कुलसचिव, वायसीएमओयू
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.