आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर गुन्हे शाखेची कारवाई:खाजगी बसमधून प्रवास करताना नववधूच्या पर्समधील 19 तोळे दागिने चोरीला; आरोपीला 24 तासांत अटक

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ते हुमनाबाद (कर्नाटक) या मार्गावर खाजगी बसमधून प्रवास करताना नववधूच्या पसॅमधून 19 तोळे दागिने चोरणाऱ्या एका संशयित आरोपीला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. दिलीप उर्फ धनुष्य रामण्णा माने (वय 26, रा. मंठाळ, बसवकल्याण बिदर-कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.

मुंबईहून हा आरोपी बसमध्ये प्रवास करत होतो. भिगवण येथे 16 जून रोजी जेवण्यासाठी बस थांबल्यानंतर पाळत ठेवून त्याने चोरी केली. सोलापूरमध्ये तो उतरला. नळदुर्ग येथे गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला होता.

24 तासात गुन्ह्याचा छडा

पोलिसांत मरीयम शेख (रा. मुंबई ) यांनी शुक्रवारी फियाॅद दिली होती. हा गुन्हा शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे व त्यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. 24 तासांमध्ये या गुन्ह्याचा छडा लावला असून सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.

7 लाखांचा ऐवज चोरीला

मरियम मशाक शेख (रा. कुरेशी कंपाऊंड, बहीराम बाग, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई ) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. 19 तोळे दागिन्यात 6.5 तोळे 3 नेकलेस, 3 जोड कानातील फुले, टॉप्स, 3 जोड सोन्याची चैन, लेडीज अंगठी, पिळ्याची अंगठी, साखळी असे एकूण 19 तोळे दागिने, तीन हजार रुपये रोख, आणि दोन हजाराचा मोबाईल असा एकूण 7 लाख 11 हजार चोरीला गेल्याची नोंद पोलिसात आहे.

आरोपी सोलापुरला उतरला

मरियम शेख व त्यांचे भाऊ, अन्य नातेवाईक सर्वजण मुंबईहून हुमनाबाद येथे बस ( एनएल 01 बी 1265) मधून प्रवास करत होते. मध्यरात्रीच्या दीडच्या सुमाराला भिगवण येथे बस जेवणासाठी काही काळ थांबली होती. पुन्हा बस तिथून निघाल्यानंतर पावणे सहाच्या सुमाराला नळदुर्गजवळ बसमध्ये एक महिला जोरात ओरडली. यामुळे सगळे प्रवासी जागी झाले. त्या महिलेच्या पर्समधून पैसे काढून घेण्यात आले होते. चोरी झाल्याचे आरडाओरडा करताच मरियम शेख यांनीही आपल्या पर्समधील दागिने पाहिले असता त्यावेळी त्यांच्या पर्समध्ये दागिने,पैसे, मोबाईल नव्हते. बसमध्ये त्यांच्या पाठीमागे बसलेला एक तरुण सोलापूरमध्ये उतरल्याचे समजले. यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच सोलापुरात येऊन त्यांनी फिर्याद दिली होती. त्यांचे 4 दिवसांत लग्न होते.

बातम्या आणखी आहेत...