आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहोळ:प्रेमसंबंधातून 19 वर्षीय मुलाची अल्पवयीन मुलीसह एकाच स्कार्फने गळफास घेत आत्महत्या, शहरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

मोहोळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ शहरात प्रेमी युगुलाने झाडाल एकाच स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (६ जानेवारी) दुपारी ३ च्या दरम्यान उघडकीस आली. तालुक्यात पुन्हा एकदा प्रेम प्रकरणातून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, भूषण धनंजय पडवळकर रा. देशमुख गल्ली मोहोळ याचे वैष्णवी नामदेव थोरे (वय, १७ वर्षे) रा. स्टेशन रोड, मोहोळ या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. भूषण हा शेती करत होता तर वैष्णवी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दि.६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान भूषण व वैष्णवी या दोघांनी मोहोळ-वडवळ रोडवर असलेल्या बी.पी.एड. कॉलेजच्या परिसरातील चिंचेच्या झाडाला एकाच स्कार्फने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दिवसाच घडलेल्या या प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक व पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर दोघांचेही मृतदेह शासकीय दवाखान्यांमध्ये नेण्यात आले. भूषण व वैष्णवी यांनी प्रेमसंबंध मधून आत्महत्या केल्याची खबर संजय विलास पडवळकर यांनी पोलिसांत दिली असून पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...