आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीनगरी भाविकांनी गजबजली:कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत 2 लाख भाविक दाखल

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत सुमारे २ लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. ४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या एकादशीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. सध्या श्री विठ्ठल दर्शनाची रांग पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी १० ते १२ तासांचा अवधी लागत आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी दिली. कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या पंढरपुरात दाखल होत असल्याने पंढरीनगरी भाविकांनी गजबजली आहे. मठ, मंदिरे, धर्मशाळा, चंद्रभागा वाळवंट आणि ६५ एकर मैदान भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. हा परिसर भजन, कीर्तनाने गजबजला आहे.

बातम्या आणखी आहेत...