आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:उपचार सुरू असताना आणखी 2 मुलांचा मृत्यू; यार्डजवळील दुर्घटनेतील मृतींची संख्या तीनवर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेळगी परिसरातील अॅग्रो कृषी मिलसमोर शुक्रवारी दुपारी झालेल्या ट्रक - रिक्षा अपघातातील आणखी दोन मुलांचा शनिवारी मृत्यू झाला. शुक्रवारी १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. सात जण जखमी होते. शनिवारी उपचारादरम्यान अल्नाज हुसेन कोरबू (वय ७, रा. मित्र नगर शेळगी) या मुलीचा आणि मुलाणी‌ (वय ५) या मुलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण मृताची संख्या तीन झाली आहे.

अपघातातील आणखी पाच जणांवर उपचार सुरू आहेत. याबाबत शुकूर मुलाणी यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. फौजदार संजीवनी व्हटे तपास करत आहेत. ट्रक एमएच ४३ बीपी ८७८८ आणि रिक्षा एमएच १३ एएफ २२०९ यांची समोरासमोर धडक बसली होती. ट्रकचालक रामराजे निंबाळकर (रा. कोंडी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...