आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभावासोबत मोटासायकलवरून निघालेल्या दोन बहिणींचा दोन वेगवगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे. राधा आवटे आणि अक्षरा जमदाडे अशी दोन्ही मुलींची नावे आहेत. दोन्ही अपघातातील मुलींचे दोघे भाऊदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. पहिली घटना : अक्षरा देविदास जमदाडे (वय १४ वर्षे रा. भोसे, ता. पंढरपूर) ही शाळकरी मुलगी भावासोबत शाळेतून घरी जात होती.
भोसे पाटी चौकात पिकअप (क्र. एमएच १३ एएन ८२३३) चालकाने अचानक दरवाजा उघडला. मोटारसायकल (क्र. एमएच १४ सीएक्स ८०५२) जोरात खाली पडली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरा सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ठाण्यात नोंद झालेली नव्हती. दुसरी घटना : पेहे, ता. पंढरपूर केंद्रावरून दहावीचा पहिला पेपर देऊन ढेकळेवाडी, ता. मोहोळ येथे जात असताना जळके झाड अंगावर पडून राधा नागनाथ आवटे रा. बादलकोट, ता. पंढरपूर हीचा जागीच मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.