आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:खेळताना हौदात बुडून 2 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

कुर्डूवाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर खेळताना बांधकामासाठी प्लास्टिक कागद टाकून केलेल्या अडीचफुटी हौदातील पाण्यात बुडाल्याने एका २ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

शिवांश सचिन बागल असे चिमुरड्याचे नाव असून ही घटना १९ रोजी घाटणे (ता. माढा) येथील गाडे यांच्या घरासमोर घडली. मुलगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर पाच ते सहा मिनिटांत त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.

डॉक्टर चंद्रशेखर साखरे हॉस्पिटल कुर्डूवाडी (ता. माढा) यांनी दिलेल्या खबरीवरून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...