आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:2 वर्षांच्या चिमुकल्याला 6 किलोमीटर फरफटत नेले; फरफरटत नेल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली जिल्ह्यातील जत गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका कारचालकाने 2 वर्षाच्या चिमुकल्याला 6 किलोमीटर फरफटत नेले. या झालेल्या अपघातात 2 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अपघाताची ही थरारक घटना समोर येताच सांगली येथील जत गावात खळबळ उडाली आहे.

अब्दुल समद साजिद शेख असे मृत्यू झालेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. आरोपाला पोलिसांनी 30 वर्षीय कारचालक महादेव मधुकर कुंडले याला पोलिसांनी अटक केली आहे. दिलेल्या माहितीनुसार, विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर धावडवाडी हे गाव आहे. या गावातील रहिवासी असणारे साजिद लालखान शेख हे आपली पत्नी जबिन आणि दोन वर्षीय मुलगा अब्दुल यांना घेऊन दुचाकीने आपल्या शेताकडे निघाले होते.

जांभूळवाडी फाट्याजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात साजिद शेख जोरदार रस्त्यावर आपटले. तर पत्नी जबिन आणि मुलगा अब्दुल कारच्या बंपरमध्ये अडकून किमान 300 मीटरपर्यंत फरफटत गेले. याठिकाणी जबिन या ही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. पण दोन वर्षीय अब्दुल मात्र कारच्या बंपरमध्ये तसाच अडकून राहिला. हा चिमुकला बंपर मध्ये अडकून सुद्धा आरोपी दोन वर्षीय चिमुकला मधूकर चालक कुंडले याला थोडीशीही दया आली नाही.

कारचालक सुसाट वेगाने चिमुकल्याला तब्बल सहा किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. या धक्कादायक घटनेमुळे या 2 वर्षीय चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले. सदरील या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढीस तपास पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...