आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण शिबिराचे आयोजन:स्काऊड गाइड निवासी प्रशिक्षणामध्ये 200 शिक्षक

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत स्काऊट आणि गाइड शहर जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने २४ नोव्हेंबरपर्यंत ज.रा.चंडक प्रशालेमध्ये स्काऊट मास्टर -कब मास्टर, फ्रॉक लीडर - गाइड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात या शिबिरास जिल्हाभरातून २०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत घेतले जात आहे.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे येथील अध्यक्ष निर्मला ठोकळ यांच्या हस्ते झाले. यावेळी शिल्पा ठोकळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय जावीर, माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, विस्ताराधिकारी अशोक भांजे, मुख्याध्यापक सर्वश्री जाधव, घोडके व अतकरे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आठवडाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना माजी शिक्षणाधिकारी विद्या जगताप म्हणाल्या की आपल्या विद्यार्थ्यांना सेवा, आरोग्य, हस्तव्यवसाय व चरित्र या मूलतत्त्वावर आधारलेले चार भिंतीबाहेरचे शिक्षण देऊन एक उद्याचा देशासाठी सुसंस्कारक्षम नागरिक बनविणे हेच या स्काऊट गाइड चळवळीचे मुख्य उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...