आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:नेहरूनगर परिसरात 20 हजार रुपये, सोन्याचे दागिने चोरीला

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर रोड येथे भाजी आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर शालुबाई भगवान जाधव ( बाकळे कटपीस शेजारी, नेहरूनगर ) यांच्या घरात चोरी झाली आहे‌.

९ हजार किमतीचे कानातील फुले, २० हजार असा ऐवज चोरीला गेला आहे. विजापूर नाका पोलिसांत १० मे रोजी फिर्याद देण्यात आली आहे. संशयित आरोपी म्हणून गोपाळ चंदू राठोड (रा. नेहरूनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जाधव या भाजी आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. पुन्हा घरी आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. संशयित आरोपी गोपाळ राठोड हा कपाटाजवळ उभा होता, चावी घेऊन कपाट उघडताना त्याला आवाज दिल्यानंतर तो धक्का देऊन पळून गेला. संशयित आरोपी हा घराशेजारीच राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...