आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:वसंत विहारात आढळतात 21 प्रकारच्या सर्प प्रजाती ; पॅराडाइज मंडळातर्फे जनजागृती

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत विहारमध्ये २१ प्रकारच्या सापांची प्रजात आढळून येते. पैकी १५ बिनविषारी आहे तर ५ विषारी. मण्यार या विषारी सापाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले. वसंत विहार येथील बालाजी पॅराडाईज गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सर्प जनजागृती कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते ‘आपल्या परिसरातील साप’ या विषयावर श्री. शिंदे यांनी वसंतविहारमध्येच आढळून येणाऱ्या सापांविषयी माहिती दिली. बिनविषारी सापांमध्ये धामण, तस्कर, कवड्या, पाणदिवड आदी साप आहेत. पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सर्प, मृदुकाय सर्प, डुरक्या घोणस असे दुर्मिळ जातीचे सापही आढळतात. निमविषारी असणारा एकमेव मांजऱ्या सर्पही वसंत विहारात आढळतो. विषारी सापांमधील नाग, मण्यार, घोणस हे जास्त प्रमाणात आढळतात तर फुरसे आणि पोवळा सर्प अल्प प्रमाणात आढळतात, असेही ते म्हणाले.

या वेळी नॅचरल ब्ल्यू कोब्रा संस्थेचे संस्थापक दीपक इंगळे व अध्यक्ष अनिल अलदार यांनी सर्पदंशावरील प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक दाखवले. वनरक्षक शुभांगी कोरे व सिद्धाराम कोरे यांनीही हजेरी लावली. सुदन सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता सातपुते, भाग्यश्री सुरवसे, ज्योती उत्तरकर, अंजली कुंभार, रूपाली कदम, संध्या भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...