आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:महाआरोग्य शिबिराचा‎ 210 जणांनी घेतला लाभ‎; लहुजी वस्ताद तरुण‎ मंडळातर्फे आयोजन‎

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिवीर लहुजी शक्ती‎ सेना व तरुण मंडळ लष्कर यांच्या‎ वतीने मोफत महाआरोग्य शिबिरात‎ २१० नागरिकांना लाभ झाला.‎ अश्विनी ग्रामीण वैद्यकीय‎ महाविद्यालय, दवाखाना व संशोधन‎ केंद्र, कुंभारी यांच्या वतीने भारतबाई‎ क्षीरसागर व संभाजी शिवराम‎ क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण‎ दिनानिमित्त मोफत महाआरोग्य‎ शिबिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे‎ सार्वजनिक वाचनालय, लष्कर येथे‎ झाले. शिबिरामध्ये बालरोग, त्वचा‎ रोग, हृदयरोग, दमा (अस्थमा) ,‎ पोटाचे विकार , हत्ती रोग , मेंदूचे‎ विकार, पक्षाघात, संधिवात,‎ इ.सी.जी., रक्तदाब (बी.पी.) ,‎ मधुमेह (शुगर), स्त्रीरोग ,‎ प्रसूतपूर्व प्रसूतिपश्चात आदी‎ तपासण्या करण्यात आल्या. यावेळी‎ अशोक लांबतुरे, माजी सभागृह नेते‎ देवेंद्र भंडारे, सुरेश पाटोळे, टी. एस.‎ क्षीरसागर, किशोर जाधव , मीनेश‎ बोराडे, कैलास जरीपटके, महेश‎ जोगदंड, रामचंद्र जोगदंड, विकास‎ जरीपटके आदींची उपस्थिती होती.‎ डॉ. रक्षा गायकवाड, डॉ. मुशर्फा‎ नदाफ, डॉ. निकिता ठाकरे, डॉ.‎ संतोष मुंडे, डॉ. संकेत वारुळे, डॉ.‎ तुषार मगर डॉक्टरांकडून तपासणी‎ करण्यात आले. यावेळी अशोक‎ बोल्लू, अश्विनी कोरे, सुमन‎ शिवशरण, बिलाल नल्लाबद्दु,‎ शारदा पाटील आदी कर्मचाऱ्यांचे‎ सहकार्य लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...