आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • 2128 Members Of Bhima Sugar Factory Canceled; Challenge To Co operation Minister, Decision Of Regional Sugar Joint Director Darade | Marathi News

विरोधकांना धक्का:भीमा साखर कारखान्याच्या 2128 जणांचे सभासदत्व रद्द; सहकारमंत्र्यांकडे आव्हान, प्रादेशिक साखर सहसंचालक दराडे यांचा निर्णय

मोहोळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २१२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश सोलापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक राजकुमार दराडे यांनी ११ मार्च रोजी दिला आहे. कारखान्याला ऊसपुरवठा न करणारे, कार्यक्षेत्रातील व शेतकरी नसलेले आणि केवळ निवडणूक लढवणे आणि मतदान करणे या राजकीय हेतूने प्रेरित सभासद झालेल्या २४५१ सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ११ नुसार चौकशी करावी. त्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण व नानासाहेब पवार यांनी केली होती. त्यावर हा आदेश दिला आहे. त्याला सहकारमंत्री यांच्याकडे आव्हान दिले आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर या आदेशाने विरोधी गटाला धक्का बसला आहे. तर तालुक्यातील साखर पट्ट्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ९ सप्टेंबर २०२१ रोजी चव्हाण व पवार यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. भीमा कारखान्याचे २४५१ सभासद कारखान्याला ऊसपुरवठा करत नाहीत. त्यांनी १० गुंठ्यांपेक्षा जास्त क्षेत्रात ऊस पिकवला नाही व ते कार्यक्षेत्रात नसल्याने शेतकरी नाहीत. मात्र, कारखान्याने राजकीय हेतूने प्रेरित त्यांना ऊस उत्पादक सभासद म्हणून दाखवले आहे. यातील अनेक सभासदांनी कारखान्याची शेअर्स रक्कमही पूर्णपणे भरलेली नाही. त्यामुळे याची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ११ नुसार चौकशी करून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा शिवाजी चव्हाण, सतीश भोसले यांच्यासह सभासदांच्या वतीने अॅड. वैभव देशमुख यांनी बाजू मांडली. तर या सभासदांनी सलग तीन वर्षे कारखान्यास ऊस घातला नाही. ते कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ६१ गावांतील नसल्याचे तक्रारदारांनी पुराव्यासह मांडले. त्यामुळे ते कारखान्याच्या उपविधींची पूर्तता करत नसल्याने प्रादेशिक साखर सहसंचालक दराडे यांनी २४५१ पैकी २१२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश दिला. तसेच त्यांची शेअर्स अनामत रक्कम त्यांना परत देण्याचे आदेश दिले. निर्णयाने विरोधी गटाला धक्का बसला आहे.

सहकार शिरोमणीच्या ऑनलाइन सभेत अॅड. पवार यांचे सभासदत्व केले रद्द
पंढरपूर
भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मंगळवारी ऑनलाइन झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या हिताविरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवत माजी संचालक अॅड. दीपक पवार यांचे सभासदत्व रद्द केले. त्यानंतर अॅड. पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही ऑनलाइन सभा बेकायदा असल्याने याचे कामकाज ग्राह्य न धरण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक, साखर सहसंचालक व सहकारमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच संस्था आणि सभासदांचे हित जपण्याचा प्रयत्न करताना राजकीय हेतूने हा रडीचा डाव टाकणाऱ्यांना सभासद अद्दल घडवतील, असा इशारा दिला आहे.

या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे होते. कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी विषयांचे वाचन केले. यात एसडीएफ कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या केंद्राच्या पत्रावर निर्णय घेणे, राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जाच्या ओटीएसच्या पत्रावर निर्णय घेणे, आगामी गाळप हंगामात आवश्यक तांत्रिक दुरुस्ती, आधुनिकीकरणाचा निर्णय घेणे, डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाची क्षमता दुप्पट वाढवण्यासह संस्थेच्या हिताविरोधात काम व तसे वर्तन करणाऱ्या सभासदाविषयी निर्णय घेणे असे विषय होते. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी मंजुरी दिली. या वेळी सर्व संचालक उपस्थित होते. समाधान काळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले.

थकीत बिल, वेतन मागणी संस्थेच्या हितविरोधी कसे ?
पत्रकार परिषदेत अॅड. दीपक पवार यांनी सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला. आता कोरोना संपल्याने राज्य निर्बंधमुक्त आहे. कारखान्याचे अध्यक्षही मास्क न लावता मुक्तपणे फिरत आहेत. तरीही ऑनलाइन घेतलेली ही सभा बेकायदा असल्याची टीका त्यांनी केली. फक्त २०० सभासदांना सभेची लिंक दिली होती. सभेची नोटीसही न दिल्याने ती बेकायदा आहे. याविरोधात जिल्हा निबंधकांकडे तक्रार करून न्यायालयीन लढाही देऊ. मी कधीही संस्थेच्या हिताविरोधात काम केले नाही. एकही पत्र संस्थेच्या हिताला बाधा येईल, असे दिलेले नाही. सभासदांची यादी मागणे, थकीत ऊसबिल, कामगारांच्या थकीत वेतनाची मागणी करणे संस्थेच्या हिताविरोधात कसे? असा सवाल अॅड. पवार यांनी केला.

विरोधकांनी जे पेरले ते आता उगवले
विरोधकांनी जे पेरले तेच आता उगवले आहे. २०११ मध्ये धनंजय महाडिक यांच्याकडे कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर दहा वर्षांत आम्ही राजकीय अथवा अन्य कारणाने एकाही सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही. मात्र, कायम राजकीय कुरघोडी करणाऱ्या विरोधकांनी एक वर्षापूर्वी जाणीवपूर्वक १०७८ सभासदांवर खोटे आक्षेप घेतले. सत्तेचा वापर करून त्यांचे सभासदत्व रद्द केले. त्यातील सभासदांनी या २४५१ सभासदांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. हा निर्णय योग्य आहे. यात संचालक मंडळ व प्रशासनाचा काहीही संबंध नाही.'' सतीश जगताप, उपाध्यक्ष, भीमा साखर कारखाना, टाकळी सिकंदर

बातम्या आणखी आहेत...