आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणने वीज बिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. मार्चअखेरपर्यंत ३९ कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य शहर विभागाला देण्यात आले आहे. मागील १८ दिवसांत २२० जणांचे वीज तोडण्यात आले आहे. महावितरणकडून नियमितपणे वसुली मोहीम सुरू असतेच. परंतु, मार्च महिन्यात ती तीव्र केली जाते. जे थकबाकीदार थकबाकी भरत नाहीत, अशांचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाताे.
शहरात पाच उपविभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयांद्वारे वसुली केली जाते. ४४ हजार ७८३ वीज ग्राहकांकडून ७ कोटी ६७ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. एका महिन्याचे बिल ३१ कोटी ८६ लाख रुपये आहे. थकबाकी आणि बिल मिळून ३९ कोटी ५३ लाख ७१ हजार रुपये मार्चअखेर वसूल करण्याचे लक्ष्य शहर विभागावर आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वेळेवर बिल भरा कटू कारवाई टाळा
अाम्ही सुरक्षित अाणि सुरळीत विद्युत पुरवठा करत अाहाेत. ग्राहकांनी विजेचे बिल वेळेवर भरावे. थकबाकी नाही भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करावा लागणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वेळेवर बिल भरावे.- आशिष मेहता, कार्यकारी अभियंता महावितरण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.