आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारीसाठी कारखानदारांना मनपा देणार पत्र‎:अग्निशमनसाठी 2.3 कोटींचा‎ प्रस्ताव नियोजन समितीकडे‎

सोलापूर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट रोड औद्योगिक‎ वसाहतीत वारंवार आग लागण्याचे‎ प्रकार घडत आहेत. तेथे पालिकेचे‎ अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार‎ आहे. त्यासाठी जागा निश्चिती‎ झाली असून, तेथे पाणी व फोम‎ बंबसह इतर साहित्यासाठी २ कोटी‎ ३० लाख रुपयांचा प्रस्ताव पालिकेने‎ तयार केला आहे. तो जिल्हा‎ नियाेजन समितीकडे दोन दिवसांत‎ पाठवण्यात येणार आहे. तसेच‎ आगीपासून बचाव करण्यासाठी‎ कारखानदारांनी कोणती खबरदारी‎ घ्यावी आणि काय नियोजन करावे‎ याबाबत महापालिकेकडून‎ कारखानदारांना पत्र देण्यात येणार‎ असल्याचे पालिका प्रशासक शीतल‎ तेली यांनी सांगितले.‎ आगीपासून सरंक्षण करण्यासाठी‎ कारखानदारांनी साइड मार्जिन‎ सोडणे, पाणी फवारण्यासाठी योग्य‎ ते नियाेजन करणे, विद्युत आॅडिट‎ करून घेणे आवश्यक आहे. विद्युत‎ दाब कमी अधिक झाल्याने‎ शाॅर्टसर्किट होऊन आग लागण्याचे‎ प्रकार घडतात. याबाबत‎ कारखानदारांना सजग करण्यात‎ येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...