आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावळत्या सरपंचांच्या सौभाग्यवतीही बिनविरोध:23 वर्षीय गीतांजली होणार शिवनी ग्रामपंचायत सदस्य

उत्तर सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गीतांजली खळसोडे ही २३ वर्षांची युवती शिवणी ग्रामपंचायत सदस्य होणार आहे. वाणिज्य विषयात पदवीधर असलेल्या गीतांजलीचा प्रभाग क्रमांक एकमधून एकमेव अर्ज आल्याने ती बिनविरोध निवडली जाणार आहे. तिच्यासोबत भाग्यश्री सुरवसे या महिला उमेदवारही शिवणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी बिनविरोध निवडल्या जाणार आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात सीनेकाठी असलेल्या शिवणी ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे. सात सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेतून गीतांजलीचा तर इतर मागास प्रवर्गासाठी राखीव जागेतून भाग्यश्री सुरवसे यांचा एकमेव अर्ज असल्याने याबाबत घोषणा होणे औपचारिकता उरली आहे. भाग्यश्री सुरवसे या मावळते सरपंच प्रशांत राखे यांच्या पत्नी आहेत.

माजी आमदार दिलीप माने यांनी मागील पस्तीस वर्षांत केलेल्या कामाची ही पोहोच पावती असल्याचे म्हटले आहे. उर्वरित पाचही जागा माने गट एकतर्फी जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच अशोक गुंड, प्रशांत राखे, लक्ष्मण बापू गुंड, विकास सोसायटीचे चेअरमन वैजिनाथ गुंड, उत्तम गुंड, ब्रह्मदेव गुंड, सेवानिवृत्त सचिव अशोक गुंड, हनुमंत गुंड, दादा गुंड, महेश गुंड, शशिकांत खळसोडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...