आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयच्या 235 विद्यार्थ्यांना संधी:सोलापुरातील 11 कंपन्यांत नोकरी; शिकाऊ उमेदवार मेळाव्यास 480 जणांची नोंदणी

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर सर्व जग पूर्वपदावर येत आहेत. सर्व व्यवहार व उद्योग-कारखाने क्षमतेने सुरु झालेल्या आहेत. तरी गरज ओळखून आयटीआय मध्ये उत्तीर्ण असलेले व अंतीम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी उमेदवार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यातून 235 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. मेकॉनिकल, विद्युत वायरिंग,संगणक, ब्युटी पार्लर, शिवणकाम आदींसाठी विद्यार्थी व विद्यार्थींनीची निवड करण्यात आली आहे.

कौशल्य विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विजापूर रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार मेळाव्याचे सोमवारी आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी सोलापुरात कार्यरत असलेल्या विविध उद्योग व कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.

एकुण जिल्ह्यातील 12 विविध आस्थापनांनी सहभाग घेतला त्यातील प्रत्यक्षात 11 कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थिती दर्शवली. प्रत्येक कंपनीच्या एच आर विभागाकडून मुलांची मुलाखतीद्वारे निवड केली आहे. या कंपन्यांमध्ये चिंचोळी एमआयडीसीमधील उद्योग व फर्मचा सहभाग होता.

शिकाऊ उमेदवार या मेळाव्यासाठी सोलापुरातील एकुण एकुण 480 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये विविध कंपन्यांकडे 260 रिक्त जागा होत्या. ही गरज ओळखून प्रत्येकानी उमेदवाराची निवड केली आहे. एकुण 235 विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून तात्काळ रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये 175 मुले व 60 मुलींचा समावेश आहे. जास्त करुन मुली ब्युटी पार्लर व शिवणकाम यासाठीच निवड केली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प्र.प्राचार्य महादेव उडाणशिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बसवराज मोरे, प्रविण केंदळे आदी उपस्थित होते.

''मुलांच्या आयटीआय मध्ये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार मेळावा पहिल्यांदाच होत आहे. या मेळाव्यासाठी फक्त जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण झालेल्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक कंपनीने त्यांच्या गरजेनुसार मुलांची निवड केली आहे. मात्र जास्त करुन मेकॅनिकल व विद्युत वायरिंग, संगणक कामासाठी मुलांची निवड झाली आहे. या मुलांकडून काही दिवसात त्या कंपन्यांकडून नियुक्त पत्रही मिळतील.''- महादेव उडाणशिवे, उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

बातम्या आणखी आहेत...