आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळाव्याचे आयोजन:11 कंपन्यांतर्फे आयटीआयच्या 235 विद्यार्थ्यांना मिळेल संधी ; उद्योग व फर्मचा सहभाग

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर सर्व जग पूर्वपदावर येत आहे. सर्व व्यवहार व उद्योग-कारखाने क्षमतेने सुरू झाले आहेत. गरज ओळखून आयटीआयमध्ये उत्तीर्ण असलेले व अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, यासाठी उमेदवार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यातून २३५ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. मेकॅनिकल, विद्युत वायरिंग, संगणक, ब्युटी पार्लर, शिवणकाम आदींसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे.

कौशल्य विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विजापूर रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार मेळाव्याचे सोमवारी आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी सोलापुरात कार्यरत असलेल्या विविध उद्योग व कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. एकूण जिल्ह्यातील १२ विविध आस्थापनांनी सहभाग घेतला. त्यातील प्रत्यक्षात ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. प्रत्येक कंपनीच्या एच.आर. विभागाकडून मुलांची मुलाखतीद्वारे निवड केली आहे. या कंपन्यांमध्ये चिंचोळी एमआयडीसीमधील उद्योग व फर्मचा सहभाग होता. शिकाऊ उमेदवार या मेळाव्यासाठी सोलापुरातील एकूण ४८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विविध कंपन्यांकडे २६० रिक्त जागा होत्या. ही गरज ओळखून प्रत्येकाने उमेदवाराची निवड केली आहे. एकूण २३५ विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून तत्काळ रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये १७५ मुले व ६० मुलींचा समावेश आहे. जास्त करून मुलींनी ब्युटी पार्लर व शिवणकाम यासाठीच निवड केली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प्र. प्राचार्य महादेव उडाणशिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बसवराज मोरे, प्रवीण केंदळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...