आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया नवरात्रीत ग्रह-नक्षत्रांच्या शुभ स्थितीमुळे प्रत्येक दिवसाचा शुभ योग आहे. यामुळे मालमत्ता, वाहन आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मुहूर्त आहे. ज्योतिषांनुसार, नवरात्रीदरम्यान नऊ दिवस केलेल्या खरेदीमुळे समृद्धी आणि सुख वृद्धिंगत हाेते. नवरात्रीत विशेषत: जमीन-घर आणि वाहनांची खरेदी-विक्री शुभ मानली जाते. एवढेच नव्हे तर या वर्षी तिथीत क्षय नसल्याने देवीच्या पूजेसाठी संपूर्ण नऊ दिवस मिळाले आहेत. हा एक शुभ योग आहे.
प्रत्येक दिवस शुभ मुहूर्त : पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्या म्हणण्यानुसार, या वेळी घटस्थापना तीन राजयोग आणि शुभ मुहूर्तात झाली आहे. सोबत रामनवमीपर्यंत खरेदीसाठी सर्वार्थसिद्धी, पुष्य नक्षत्र, बुधादित्य, शोभन, पद्म आणि रवियोग यासारखे विशेष मुहूर्त झाले आहेत. हा योग मालमत्ता, वाहन, फर्निचर, भौतिक सुख-सुविधांची सामग्री आणि मंगल कार्यासाठी खरेदी शुभ राहील.
नव्या सुरुवातीसाठी अष्टमी-नवमी तिथी शुभ : ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट म्हणाले, चैत्र नवरात्रीची प्रतिपदा, अष्टमी, नवमी तिथी नवी सुरुवात आणि खरेदी-विक्रीसाठी शुभ असते. अश्विनी, रोहिणी, मृगशिरा आणि पुष्य नक्षत्र खरेदीसाठी शुभ मानले जाते. या तिथी-नक्षत्रांत नव्या सुरुवातीस यश मिळणे जवळपास निश्चित असते.
याची खरेदी फलदायक : नवरात्रीदरम्यान वाहन, संपत्ती, दागिने, कपडे, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते. हे नऊ दिवस सांसारिक रचना करणाऱ्या शक्तीचे पर्व आहे. त्यामुळे सांसारिक उपयोगाची साधने आणि भौतिक सुख-सुविधांची खरेदी केली जाऊ शकते. यात शस्त्र, अवजार,ऊर्जा सामग्री शुभ असते.
दिवस आणि योग
८ एप्रिल, शुक्रवार : बुधादित्य, शोभन आणि पद्म योगामुळे या दिवशी दागिने,सुख-सुविधा, फर्निचर आणि सजावटीची सामग्री खरेदी शुभ राहील.
९ एप्रिल, शनिवार : अष्टमीला पुनर्वसू नक्षत्रामुळे छत्र योग होतोय. घर, हॉटेल वा अपार्टमेंटसाठी मालमत्ता खरेदी,बांधकाम शुभ राहील.
१० एप्रिल, रविवार : सर्वार्थसिद्धी, रविपुष्य आणि रवियोग असल्याने प्रत्येक शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ मुहूर्त.
या वर्षी चार रविपुष्य, यापैकी नवरात्रीचा योग चोवीस तास राहील
या वेळी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीला रविपुष्य योग असेल. याआधी असा शुभ योग १ एप्रिल २०१२ रोजी होता. हे रविपुष्य योगावर चैत्र नवरात्रीला संपला होता. १० एप्रिल, रविवारी सूर्योदयासोबत पुष्य नक्षत्र सुरू होईल. हे दुसऱ्या दिवशी सूर्याेदयापर्यंत राहील. या वर्षी चार रविपुष्य असतील. मात्र, यापैकी एक पूर्ण २४ तास राहील. हे खरेदीसाठी शुभ मुहूर्त असेल. यानंतर ६ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा असा शुभ योग जुळून येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.