आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका भांडवली निधीतून शहरात २५ कोटी रुपये खर्च करून १७ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यातील ६ रस्ते पूर्ण झाले असून, अन्य ११ रस्ते अपूर्ण आहेत. पावसामुळे रस्ते करण्यात अडचण येत असल्याचे कारण महापालिकेने गणेशोत्सव काळात दिले. हे चर्चेत असलेल्या रस्त्यांचे पावसाळा संपवून दोन महिने झाले तरी रस्ते दुरुस्तीचे काम अद्याप अपूर्ण आहे. याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना विचारले असता रस्ते होतील, असे त्यांनी सांगितले.
शहरातील सात रस्ता, जुळे सोलापूर, डाॅ. आंबेडकर चौक, नवी वेस, बसस्थानक, बलिदान चौक, रूपाभवानी परिसर, गुरुनानक चौक परिसरातील रस्ते दुरुस्ती पालिकेच्या भांडवली निधीतून करण्यासाठी पालिका अंदाजपत्रकात प्रथमच २५ कोटींची तरतूद करण्यात आली. गणेशोत्सव व नवरात्र उत्सव काळात रस्ते करण्याची मागणी हाेती.
पावसाचे कारण आणि डांबर मिळत नसल्याने रस्तेकाम थांबले. त्यानंतर दिवाळीत मजूर गावाकडे गेल्याने काम लांबवले, त्यानंतर जुळे सोलापूर, सात रस्ता या भागातील रस्ते केले. अन्य ११ रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. ते रस्ते अद्याप झाले नाहीत. एका बाजूने रस्ते केले तर अन्य बाजू तशीच आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
शहरातील अन्य रस्त्यांचे काय?
शहरातील १७ रस्ते केल्यानंतर अन्य ४०० रस्ते करणे आवश्यक आहे. महापालिकेने याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर शासन आणि महापालिकेकडून काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे १७ रस्ते होतील अन्य रस्त्याचे काय असा प्रश्न उपस्थित होतो.
यात्रा काळात ड्रेनेज पाण्यातून वाट
सिध्देश्वर मंदिर ते मार्केट पोलिस चौकीपर्यंत एक बाजूचा रस्ता ड्रेनेज लाइन पाण्यामुळे बंद आहे. त्या रस्त्यावर येण्याऱ्या पाण्याचा बंदोबस्त महापालिकेने केला नाही. मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर सोडणे गुन्हा आहे. यात महापालिका फौजदारी कारवाई करु शकते. या रस्त्यावर यात्रा काळात ड्रेनेज लाईनमधून जावे लागेल.
कामाच्या दर्जाचा अहवाल : शहरातील २५ कोटी रुपये खर्चून रस्ते दुरुस्ती करताना कामाचा दर्जा महत्वाचा आहे. रस्ते दुरुस्ती दोन टप्यात केल्याने त्यांच्या लेव्हलचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाची तपासणी आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.