आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकृत वीज:1300 पैकी 26 मंडळांनी घेतले अधिकृत वीज जोड

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १३०० मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवान्यासाठी नोंद केली आहे, पण मंडळासाठी महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन घेण्याबाबत मंडळाचा निरुत्साह दिसून येतो. शहरात फक्त २६ गणेश मंडळांनी तात्पुरते वीज कनेक्शन घेतले आहे.

गणेशोत्सवात महावितरणातर्फे मंडळांना घरगुती दराप्रमाणे अकरा दिवसासाठी तात्पुरते वीज कनेक्शन दिले जाते. तसेच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जागोजागी जाऊन मंडळांना भेटून जनजागृती करतात. असे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे

गणेश मंडळांनी अकरा दिवसांसाठी महावितरणच्या माध्यमातूनच अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे. घरातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून वीज कनेक्शन घेतले तर त्या वायरी किती सुरक्षित आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. कुठेही वायर तुटलेली असेल किंवा चांगल्या दर्जाची नसेल तर काहीही अनुचित प्रकार होऊ शकतो. त्यासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या फायदा करून घेण्यासाठी गणेश मंडळांनी महावितरणकडूनच अधिकृत वीज कनेक्शन घेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...